घणसोलीत अनधिकृत इमारतींवर कारवाई

नवी मुंबई,19डिसेंबर 2016 / AV News Bureau :

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील घणसोली विभागात  तीन अनधिकृत इमारतींवर पालिका अतिक्रमण विभागातर्फे १९ डिसेंबर रोजी कारवाई केली.

सिध्दार्थ नगर, राबाडा येथे सुभाष शिंदे व इतर यांच्यामार्फत सुरू असलेल्या पाच मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीला एम.आर.टी.पी. ॲक्ट1966 नुसार नोटीस बजावण्यात आली होती. परंतु या नोटीशीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. याकरीता काँक्रीट क्रशर मशिनचा वापर करण्यात येऊन इमारतीचे बांधकाम तोडण्यात आले. याशिवाय त्या बाजुलाच राजू शिंदे व शंकर हुजगे यांच्या दोन इमारतींचे विनापरवानगी बांधकाम सुरू होते. या दोन अनधिकृत इमारतींच्या बांधकामावरही कारवाई करण्यात आली.