3 फेब्रुवारीला कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक

विधान परिषद सदस्य रामनाथ मोते यांचा 5 डिसेंबर 2016 ला कार्यकाल संपल्याने व्दिवार्षिक निवडणुका 

नवी मुंबई,6 जानेवारी 17/AV News Bureau :

कोकण शिक्षक मतदार संघांतील विधान परिषद सदस्य आमदार रामनाथ मोते यांचा कार्यकाल 5 डिसेंबर 2016 रोजी संपला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 3 फेब्रुवारी रोजी व्दिवार्षिक निवडणूक होणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 4 जानेवारी 2017 पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.यावेळी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशांत बुरडे उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रम

  • 10 जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार
  • 17 जानेवारी नामनिर्देशन सादर करण्याची शेवटची तारीख
  • 18 जानेवारी लानामनिर्देशनपत्रांची छाननी
  • 20 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
  • 3 फेब्रुवारी मतदानाची तारीख
  • 6 फेब्रुवारी मतमोजणी आणि निकालाची तारीख

 मतदारसंघातील जिल्हे

  • ठाणे
  • रायगड
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
  • पालघर

नवीन मतदार यादीनुसार कोकण विभागाताली जिल्हानिहाय मतदार संख्या

  • ठाणे – 15736
  • पालघर – 5115
  • रायगड – 10009
  • रत्नागिरी – 4328
  • सिंधुदुर्ग – 2456

      एकूण  – 37644

प्रस्तावित मतदान केंद्र

  • ठाणे – 21
  • पालघर – 13
  • रायगड – 28
  • रत्नागिरी – 17
  • सिंधुदुर्ग – 19

    एकूण – 98

3 फेब्रुवारीला  होणाऱ्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती देताना कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख.