10 जानेवारी रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

नवी मुंबई 7 जानेवारी/ AV News Bureau :

कोकण विभागीय पेन्शन अदालत 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कोकण भवन येथील पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

कोकण विभागात येणाऱ्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आदी जिल्ह्यांमधील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रकरणाच्या अडचणीचे या पेन्शन अदालतीमध्ये निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्श न प्रकरणांबाबतच्या तक्रारींचे अर्ज पेन्शन अदालतीमध्ये स्वीकारले जातील.

सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचा-यांची पेन्शनसंबधीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विभागीय स्तरावर पेन्शन अदालत आयोजित केली जाते. त्यामुळे ज्याची पेन्शनसंबंधी तक्रारी असतील, त्यांनी कोकण विभागीय पेन्शन अदालतमध्ये अर्ज आणि सविस्तर कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्तांनी केले आहे.