नायलॉन मांजावर बंदी

मुंबई, 8 जानेवारी 17/ AV News Bureau :

मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे नागरिक तसेच प्राण्यांना दुखापत होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने नॉयलॉनच्या मांजाचा वापर तसेच साठवणूकीवर बंदी घातली आहे.

मकरसंक्रांतीच्या सणाच्या काळात प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या सर्वसाधारणपणे नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी व मानव जिवितास इजा पोहोचण्याचे प्रकार घडले आहेत.  अनेकदा या इजा प्राणघातक ठरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून राज्य शासनाने योग्य त्या उपाययोजना आणि जनजागृती विषयक कार्यक्रम हाती घेण्यासाठी पर्यावरण अधिनियम १९८६चे कलम ५ अन्वये निर्देश दिले आहेत.

kite

घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. तसेच या नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणारा धोका, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवित हानी आदी प्रकार टाळण्यासाठी व या धाग्याचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.