माझे मत

दर मंगळवारचा प्रश्न-

प्रश्न – वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे रस्त्यावरील वर्दळ खूप वाढली आहे. त्यातच वाहतुकीचे नियम न पाळणे, मद्यपान करून वाहन चालविणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून निरपराध्यांचे बळी जात आहे. यापार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. याबाबत अविरत वाटचाल न्यूजकडे वाचकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया-

kiran-makare

  • लक्षात ठेवा, तुमचे कुटुंब तुमची वाट पाहत आहे. काळजी घ्या. – किरण मकरे, सायन मुंबई

prakash-rao

  • माझ्यामते सुरक्षित प्रवासाठी वाहनचालकांनी सर्वप्रथम वाहतुकीचे नियम पाळण्याची शिस्त अंगी बाणवावी. याव्यतिरिक्त बेशिस्त वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले पाहीजे आणि नियमांना पायदळी तुडविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना जबर दंड ठोठवावा. तरच रस्ते अपघातात निरपराध्यांचे जीव जाणार नाहीत. – प्रकाश राव, सीबीडी नवी मुंबई

rahul-jainar

  • मद्यपान करून गाडी चालविणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देणे योग्य नाही. कारण दंड भरून सुटका करून घेता येते, असा समज मद्यपि वाहन चालकांचा झाला आहे. त्यामुळे मद्यपि वाहनचालकांविरोधात कडक कारवाई करून त्यांचा वाहन परवानाच रद्द करावा. तरच अशा गोष्टींना आळा बसेल. – राहुल जैनार, मानखुर्द, मुंबई

sandip-gangurde

  • सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी सरकारने रस्ता सुरक्षा सप्ताहच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. नागरिकांनीही आपल्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सहभागी झाले पाहीजे. तसेच दुचाकी तसेच कार चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी व्यवस्थापनांनी हेल्मेट घालणे आणि सीटबेल्ट बांधणे बंधनकारक केले पाहिजे. –संदिप गांगुर्डे, मुंबई

kishor-zakade

  • रस्ते सुरक्षेबाबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटनांना सोबत घेवून काम करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह हे मोठे व्यासपीठ आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत नागरिक तसेच वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. रस्ते अपघात हे मानवनिर्मित अधिक असतात. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अथवा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून पादचारी तसेच गाडीतील प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, याबाबत वाहनचालकांमध्ये जागरूकता करणे गरजेचे आहे. – किशोर झाकडे, मुंबई