पनवेलच्या काही भागात आज वीज नाही

 पनवेल 17जानेवारी 17/AV News Bureau:

पनवेल विभागातील वीज वाहिनींच्या दुरूस्तीचे काम आज करण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेल विभागातील काही भागाचा वीजपुरवठा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

 महावितरण कंपनीच्या २२ के.व्ही. भिंगारी १  तसेच २२ के.व्ही. भिंगारी  तसेच २२ के.व्ही. सेंट्रल एक्साईज व २२ के.व्ही. विघ्नंहर हिलरेसिडेन्सी या वीज वाहिनींचा वीजपुरवठा आज बंद राहील.

 २२ के.व्ही. भिंगारी  या वीज वाहिनीवरील पनवेल-, साईनगर, गव्हाण, पनवेल- आदी परिसराचा वीजपूरवठा तसेच २२ के.व्ही. भिंगारी  या वीज वाहिनीवरील ओवळा, कुंडेवहाळ, वाघिवली, वरचे ओवळे, चिंचपाडा, वडघर, कोल्ही कोपर, विठ्ठलवाडी, तळेवाडी, से. व  ए करंजाडे, पारगांव, गव्हाण, नाव्हा व इं.गावे आदी परिसराचा वीजपूरवठा तसेच २२ के.व्ही. सेंट्रल एक्साईज या वीज वाहिनीवरील कामोठे नोड आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी १० ते संध्याकाळी  वाजेपर्यंत बंद राहील.  २२ के.व्ही. विघ्नंहर हिलरेसिडेन्सी या वीज वाहिनीवरील से.१२, १३, १४, २० आणि २१ आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी ११ ते संध्याकाळी  वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे महावितरणने कऴविले आहे.