रेल्वे आरक्षणात आधार क्रमांक वैकल्पिक

अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली, 1 जून 2018:

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने तिकिट आरक्षणासाठीच्या अर्जात काही बदल केले आहेत. यानुसार प्रवाशाने विकल्प हा पर्याय निवडल्यास आणि ते प्रतिक्षा यादीत असल्यास त्यांना 12, 24, 48 तासात रवाना होणाऱ्या पर्यायी ट्रेनची निवड करता येईल. नव्या बदलानुसार या अर्जात आधार क्रमांकाची नोंद करणे वैकल्पिक असणार आहे.

ऑनलाईन आरक्षणाबरोबरच आरक्षण खिडक्यांवरही विकल्प योजनेचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. विकल्प ही योजना संकल्पना म्हणून 2015 मध्ये सुरू करण्यात आली. सुरुवातीला उत्तर-रेल्वेच्या दिल्ली-लखनऊ आणि दिल्ली-जम्मू या विभागात इंटरनेटद्वारे बुकिंग केल्या जाणा-या तिकिटांवर फक्त सहा महिने पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. नंतर ही योजना भारतीय रेल्वेच्या सर्व क्षेत्रांत विस्तारित करण्यात आली.