सिडको घर योजनेतील पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जाहीर

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ७ जून २०१९:

सिडको महागृहनिर्माण योजना 2018-2019 च्या पात्र व अपात्र अर्जदारांची यादी सिडकोच्या www.cidco.nivarakendra.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदारांना स्वत:च्या लॉगीनमध्ये जाऊन “माय अप्लीकेशन” वर क्लिक करुन पात्र अथवा अपात्र असल्याचे पाहता येणार आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 15 दिवसांची शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना तफावत आढळून आली आहे अथवा ज्या अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा अपात्र अर्जदारांना अपिल करण्यासाठी 15 दिवसांची मुदत सिडको गृहनिर्माण योजना 2018-19 च्या माहिती पुस्तिकेतील नियमाप्रमाणे देण्यात आली आहे.

  • अर्जदारांना दिनांक 10 जून 2019 दुपारी 12 वाजल्यापासून अपिल करण्यासाठी सिडकोच्या www.cidco.nivarakendra.in संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकींग / अपॉईंटमेंट दिनांक 13 जून 2019 पासून दिनांक 3 जुलै 2019 या कालावधी करिता घेता येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
कागदपत्रांची पुर्नपडताळणी करण्यात येऊन पात्रतेबाबतचा निर्णय घेण्यात येईल व तो संबंधित अर्जदारांना संकेतस्थळाच्या माध्यमातूनच कळविण्यात येईल. अपिलावरील अंतिम निर्णय व्यवस्थापक (पणन – 2) यांचा असेल. संकेतस्थळावरून निश्चित केलेल्या भेटीच्या वेळेशिवाय अर्जदारांकडून कोणतेही अपील स्विकारले जाणार नाही. जे अर्जदार संपूर्ण प्रक्रीयेत अपात्र ठरतील अशा अर्जदारांनी कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तता केल्यास सिडकोच्या भविष्यातील गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुनःश्च अर्ज करून सोडतीद्वारे यशस्वी झाल्यास पात्र ठरू शकतील. अर्जदारांनी अपिलाकरीता सिडको निवारा केंद्र, आठवा मजला, टॉवर नं. 10, बेलापूर स्टेशन कॉम्प्लेक्स, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – 400614 या पत्त्यावर उपस्थित रहावयाचे आहे. अर्जदारांनी अधिक माहितीकरीता 022-62722250 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.     

================================================

इतर बातम्यांचाही मागोवा