डी. वाय. पाटील विद्यालयाचा पदवी दान समारंभ

नवी मुंबई, 23 जानेवारी 2017/AV News Burau:

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचा 11 वा वार्षिक पदवी दान समारंभ सोमवारी पार पडला. यावेळी बालाजी तांबे, गायक सुरेश वाडकर, ज्ञानेश्वर मुळे, मनोहर तारकुंडे, के. वासु आदी मान्यवरांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली.

याशिवाय पी.एच.डी. सुवर्णपदक, फेलोशिप आणि हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मानपत्र प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य म्त्री फागनसिंग कुलस्ते, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि संस्थापक कुलपती डॉ.डी.वाय.पाटील, कुलपती डॉ. विजय पाटील आणि कुलगुरू डॉ.शिरीष पाटील आदी उपस्थित होते.