सरकारी वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, 28 जून 2017/AV News Bureau:

मुला-मुलींच्या सरकारी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर यांच्या अधिपत्याखाली वसतिगृहातील प्रवेशसाठी अर्ज मागासवर्गिय मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 118 ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंलाचे शासकीय वसतिगृह वरळी 116, संत मिराबाई मुलीचे शासकिय वसतिगृह वरळी 116, बी.डी.डी.चाळ-118 वरळी मुंबई-18 या वसतिगृहात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रवेशसाठी अर्ज करण्यासाठी संबंधितांनी या पत्त्यावर संपर्क साधावा, असे शासकिय वसतिगृहाचे गृहपाल यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.