सुभाष देसाईंची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

मुंबई, 29 ऑगस्ट 2017:

२१ हजार हेक्टर जमिनीचं आरक्षण काढून तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी केवळ बक्षी समितीकडून केलेली चालणार नाही. बक्षी समितीत पोलीस अधिकारी आणि इतर तज्ञांचा समावेश असावा. प्रकरणाशी संबंधित प्रत्येक गोष्टींची चौकशी व्हावी. तसेच निवृत्त न्यायाधीश किंवा एसआयटीमार्फत सुभाष देसाई यांची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीचा फार्स करताना मुख्यमंत्री दिसत आहेत. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते स्वतः लोकायुक्तांना विनंती करतील की त्यांनी सुभाष देसाई यांची सुद्धा चौकशी करावी. मात्र  सुभाष देसाई मित्र पक्षाचे आहेत म्हणून मुख्यमंत्री त्यांच्या चौकशीबाबत हालचाली करत नाही. मुख्यमंत्र्यांना सरकार सावरायचं आहे म्हणून त्यांनी देसाई प्रकरणात दुटप्पी भूमिका घेऊ नये. ज्याप्रमाणे प्रकाश मेहता यांची चौकशी केली जात आहे त्याप्रमाणे देसाई यांचीही चौकशी व्हावी असे तटकरे म्हणाले.