शिक्षक मतदारसंघासाठी उद्या 98 केंद्रांवर मतदान

पाच जिल्ह्यांत 37 हजार 604 मतदार 

ठाणे, 2 फेब्रुवारी 2017 / AV News Bureau:

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या 3 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील 98 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून  37 हजार 604 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची मतमोतजणी सेक्रीड हार्ट हायस्कूल, सेक्टर ४, वाशी येथे सोमवारी ६ फेब्रुवारीला  सकाळी ८ वाजता होणार आहे. . ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे 550  निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे –

  1. ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे-शिव सेना
  2. अशोक बेलसरे- लोकभारती
  3. अशोक फकिरराव बहिरव – अपक्ष
  4. आंबादास रामा काळे -अपक्ष
  5. वेणुनाथ विष्णु कडू -अपक्ष
  6. केदार नरहर जोशी -अपक्ष
  7. नरसू भरमू पाटील -अपक्ष
  8. बाळाराम दत्तात्रय पाटील- अपक्ष
  9. राजाराम दगा पाटील -अपक्ष
  10. महादेव आबा सुळे -अपक्ष
  11. मिलिंद काशीनाथ कांबळे -अपक्ष
  12. कृष्णा धाऊ म्हात्रे –अपक्ष
  13. रामनाथ दादा मोते –अपक्ष

कोकण विभागीय आयुक्तालयातील पाच जिल्ह्यांमधील मतदार मतदानात भाग घेणार आहेत. जिल्हानिहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे –

जिल्हानिहाय मतदार

कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 98 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये पालघर जिल्ह्यात 13, ठाणे जिल्ह्यात 21, रायगड जिल्ह्यात 28, रत्नागिरी जिल्ह्यात 17 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 मतदान केंद्र आहेत.

list 1list 2list 3