भाजपची 195 उमेदवारांची यादी जाहीर

अधिक जागांची मित्रपक्षांकडून मागणी

मुंबई,3 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

शिवसेनेशी युती तुटल्यानंतर एका हाती सत्ता मिळविण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेर आपली यादी बुधवारी रात्री उशीरा जाहीर केली आहे. काल दिवसभर घोषणेआधीच भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्याची बातमी पसरल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. भाजपने आपली 195 उमेदवारांची यादी जाहीर केली असून 117 मराठी उमेदवारांना संधी दिली आहे. तसेच महिला उमेदवारांनाही प्राधान्य दिल्याचे सांगितले आहे. आपले उमेदवार जाहीर करताना उर्वरित जागा मित्र पक्षांसाठी सोडल्याचे जाहीर केले आहे. मात्र 32 जागांवरच बोळवण करण्यात आल्यामुळे मित्रपक्षांमध्ये असंतोषाची भावना आहे. त्यामुळे आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी जागावाटपाबाबत भाजपची मित्र पक्षांसोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेसाठी भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे –

bjp1

bjp2

bjp3

bjp4

bjp5

bjp6