14 महिलांना प्रथम नागरिक होण्याचा मान

mayor sodat

राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाची सोडत जाहीर

मुंबईत खुला वर्ग, नवी मुंबई मागास प्रवर्ग, पनवेल अनुसूचित जाती महिला तर ठाणे महिला खुला वर्ग

मुंबई, 3 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली महापौर पदाची सोडत आज पार पडली. 27 पैकी 14 महापालिकांमध्ये प्रथम नागरिक होण्याचा मान महिलांना मिळाला आहे. आजच्या सोडतीमध्ये मुंबई खुला,  नवी मुंबईसाठी मागास वर्ग तर पनवेलमध्ये अनुसूचित जाती महिला आणि ठाण्यासाठी महिलांचा खुला वर्ग जाहीर झाला आहे.

27 महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

ST/अनुसूचित जमाती

एकूण राखीव महापालिका : 1

  • नाशिक

SC /अनुसूचित जाती

एकूण राखीव महापालिका : 3

  • पनवेल-महिला
  • नांदेड-वाघाळा-महिला
  • अमरावती

OBC/ नागरिकांचा मागास प्रवर्ग

एकूण राखीव महापालिका : 7

  • मीरा भायदर – महिला
  • जळगांव- महिला
  • चंद्रपूर – महिला
  • सांगली मिरज कुपवाड – महिला
  • पिपरी चिंचवड
  • नवी मुंबई
  • औरंगाबाद

खुला प्रवर्ग 16

8 पुरुष, 8 महिला

  • ठाणे -महिला
  • कल्याण-महिला
  • उल्हासनगर-महिला
  • परभणी-महिला
  • सोलापूर-महिला
  • कोल्हापूर-महिला
  • पुणे-महिला
  • नागपूर-महिला
  • मुंबई
  • लातूर
  • धुळे
  • मालेगाव
  • भिवंडी
  • अकोला
  • अहमदनगर
  • वसई

पनवेलच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळणार

नव्यानेच स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक लवकर होणार आहे. त्यामुळे या महापालिकेचा महापौर होण्याची संधी कोणाला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. आता अनुसूचित जाती वर्गातील महिलेला महापौर होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला महापालिकेची सत्ता मिळणार आणि कोणती महिला महापौर होणार याची चर्चा आता पनवेलमध्ये सुरू झाली आहे.