बुध्दीबळ स्पर्धेत 1200 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

नवी मुंबई, 11 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक बुद्धीबळ स्पर्धेत 1200 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. ऐरोली येथील श्रीराम विद्यालयात ही बुद्धीबळ स्पर्धा आजपासून सुरू झाली आहे.

दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रासह ठाणे जिल्ह्यातील 9 वर्षाखालील, 11 वर्षाखालील, 15 वर्षाखालील मुले व मुली तसेच 15 वर्षावरील पुरूष व महिला खुला गट असे 8 गट आहेत. यामधील विजेत्या खेळाडूंना एकूण 1 लक्ष 58 हजार 500 रक्कमेची पारितोषिके वितरित केली जाणार आहत. उद्या 12 फेब्रुवारी  रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.