बाहुबली प्रभासच्या ‘साहो’ चा फर्स्ट लूक

मुंबई, 23 ऑक्टोबर 2017/Avirat Vaatchal News:

बाहुबली म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध झालेला प्रभास आता चक्क सुटाबुटात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बाहुबली मालिकेतील दोन चित्रपटांच्या भव्य यशानंतर नंतर प्रथमच साहोच्या रुपाने प्रभास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. प्रभासचा आज 38 वा वाढदिवस असून त्याच्या साहो चित्रपटाचा पहिला वहिला  लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • बाहुबली मालिकेतील दोन्ही चित्रपटांत उघडा बंब आणि पिळदार शरीरयष्टी दाखविणारा प्रभाव ‘साहो’त मात्र सुटाबुटात दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या वहिल्या प्रसिद्ध झालेल्या पोस्टरमध्ये प्रभासने आपला चेहरा झाकलेला दिसतोय. त्याचा हा लूक बाहुबलीच्या तुलनेत पूर्णपणे वेगळा आहे. बाहुबलीच्या विक्रमी यशानंतर प्रभास आपल्या कुटुंबियांसमवेत परदेशी फिरण्यास गेला होता. थोडा आराम केल्यानंतर हैदराबाद येथे त्याने साहोच्या शुटींगला सुरूवात केली आहे.  चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी साहोचे पोस्टर ट्वीट केले आहे.

 

 

‘साहो’मध्ये प्रभासच्या जोडीला बॉलिवूडमधील कूल गर्ल श्रद्धा कपूर असणार आहे. याशिवाय निल नितीन मुकेश याचीही महत्वाची भूमिका या चित्रपटात आहे. सुजीत या चित्रपटाचे डायरेक्टर असून 2018 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रभासच्या बाहुबली मालिकेतील दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. विक्रमी कमाई करणाऱ्या या दोन्ही चित्रपटांमुळे प्रभासची क्रेझ चांगलीच वाढली असून त्याचे चाहते साहोला चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.