इस्रोने 104 उपग्रह अवकाशात धाडले

isro

भारताची विश्वविक्रमी झेप

श्रीहरीकोटा, 15 फेब्रुवारी 2017

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज एकाचवेळी तब्बल 104 उपग्रह  अवकाशात धाडत नवा इतिहास रचला आहे. श्रीहरीकोट्टा येथून सकाळी 9.28 ला पीएसएलव्ही-सी 37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने शंभरहून अधिक उपग्रह पाठवून भारताने जगातील बड्या राष्ट्रांना मागे टाकले आहे.

अवकाश संशोधन क्षेत्रात इस्रोचा दबदबा सातत्याने वाढत आहे. यापूर्वी जून 2015 मध्ये भारताने 23 उपग्रह एकाचवेळी पाठविले होते. तर रशियाने एकाच वेळी 37 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. मात्र आज भारताने कमाल करत विक्रमी शतकी कामगिरी केली. आज इस्रोने 74 किलो वजनाच्या कार्टोसॅट -2 या उपग्रहासह आणखी 103 सहयोगी उपग्रर अंतराळात यशस्वीणे पाठविण्यात आले. इस्रोच्या शास्रज्ञांनी केलेल्या या विश्वविक्रमी कामगिरीचे संपूर्ण देशात कौतूक होत आहे.

कार्टोसॅट -2 उपग्रहाचे काम

  • पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी कार्टोसॅट-2 या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

या देशांचे 103 उपग्रह सोडले

  • अमेरिका -96
  • कझाकस्तान-1
  • इस्रायल-1
  • नेदरलॅंड -1
  • स्वित्झर्लंड-1
  • युएई -1
  • भारत 2