गणेशोत्सवासाठी एसटीच्या 2216 जादा बसेस

मुंबई,20 जुलै 2017/AV News Bureau

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 2 हजार 216 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून ग्रुप बूकींग सुरू झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, प्रवाशांना प्रवासात नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दरवर्षी वाढतच असते. या वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेवून एसटीने तब्बल २२१६ बसेसची सोय केली असून या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.

  • येत्या 22 जुलै ( एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत.
  • ग्रुप बुकिंगला सुरवात 15 जुलै पासून झाली आहे.
  • परतीच्या ग्रुप बुकिंगची सुरुवात 23 जुलै पासून होणार आहे.
  • 20 ते 24 ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली कर्मचारी 24 तास कार्यरत राहणार आहेत.
  • कोकणातील महामार्गावर ठिक ठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ ( ब्रेक डाउन व्हॅन ) तैनात करण्यात येणार आहे.