नवी मुंबईतील नालेसफाईची अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्याकडून पाहणी 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 9 मे 2024

नवी मुंबई महानगरपालिका  क्षेत्रात 77 लहान – मोठे नैसर्गिक नाले असून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यांच्या सुरु असलेल्या सफाई कामांची अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पाहणी केली. पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवडयात दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी संपूर्ण शहरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी करून अभियांत्रिकी विभागाला जलदगतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

News : जागतिक हास्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात स्वच्छतेचा जागर

नाल्यांमधून जेसीबीव्दारे काढला जाणारा गाळ तसेच काही नाल्यांच्या प्रवाहात व काठांवर असणारी मनुष्यबळ लावून साफ केली जाणारी झाडे झुडपे आणि कचरा काठांवर ठेवला जात असून हा गाळ काहीसा सुकून वाहतूक करण्यायोग्य झाल्यानंतर तत्परतेने त्या ठिकाणाहून हलविण्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश देत याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देशित करण्यात आले.

News : भाजपची सावध खेळी

या पाहणीमध्ये वाशीतील से-17 नाला, से.12 नाला, से.29 नाला तसेच से.12 व से.8 येथील धारण तलाव त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील आलोक नाला, से.2 नाला, घणसोली-कोपरखैरणे नाला या नाले स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. नाल्यांची साफसफाई, धारण तलावांचे फ्लॅप गेट्स, पंपिंग मशिनरी, स्ट्रेन्चेस अशा विविध कामांची त्यांनी बारकाईने पाहणी केली.

Edit : आईचा अधिकार

आयुक्तांनी पावसाळापूर्व कामांसाठी 15 मे ही डेडलाईन दिली असून विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे संबंधित विभागांनी नियोजन करावे व विशेषत्वाने नैसर्गिक नाले सफाईच्या कामांना वेग दयावा असे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शहर अभियंता संजय देसाई यांनी निर्देशित केले आहे. या पाहणी प्रसंगी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

========================================================