महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात 501 जणांना निवडपत्रे

नवी मुंबई, 11 मार्च 2017 /AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 16 वाशी येथे जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व दिनदयाळ अंत्योद्य योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ” रोजगार मेळाव्यात 501 उमेदवारांना निवडपत्रे देण्यात आली.

रोजगार निर्मिती तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी हा रोजगार मेळाव्याचा उद्देश होता. या मेळाव्याला 3 हजारहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली होती. या रोजगार मेळाव्यात 501 युवकांना नोकरीची निवडपत्रे व व्दितीय मुलाखतीकरीता पत्रे देण्यात आली.

सन 2017-18 या आर्थिक वर्षात महापालिका अंदाजपत्रात कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या मेळाव्यात आदित्य बिर्ला ग्रुप, कामत हॉटेल्स, तुंगा हॉटेल, अपोलो हॉस्पिटल, श्रीराम ट्रांन्सपोर्ट फायनान्स, युरेका फोर्बस, कोटक महिंद्रा बॅंक, आय.सी.आय.सी.आय. बँक अशा नामांकीत 28 उद्योग / व्यवसायिकांचा समावेश होता.

यावेळी महापालिका आयुक् तुकाराम मुंडे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते.