जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी

नवी दिल्ली, 14 मार्च 2017:

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्री पदाचा अतिरिक्त भार स्वीकारला. मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी संरक्षण मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. त्यामुळे जेठली यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.

साऊथ ब्लॉकमधील संरक्षण मंत्रालयात त्यांचे आगमन झाले असता, संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे, संरक्षण सचिव जी.मोहन कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.