कोकण विभागासाठी बारामती एग्रो संस्थेतर्फे 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

 

कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे ऑक्सिजनचा साठा सुपूर्द

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17 मे 2021

बारामती ॲग्रो या संस्थेने कोकण विभागासाठी 24 ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर देऊन जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी  प्रशासनाला मदतीचा हात दिला. आज कोकण विभागाचे महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हे 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केले.

कोरोनाच्या संकटकाळात सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याच्या घटना समोर येत आहेत. राज्यात ऑक्सिजन, औषधे, उपकरणांचा तुटवडा होऊ नये यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे शासनावर अतिरिक्त ताण पडत आहे.  अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. रोहित पवार यांची बारामती ॲग्रो ही संस्था मदतीचा हात घेऊन पुढे आली आहे.  कोकण विभागासाठी 1 लिटर चे 7 आणि 10 लिटरचे (प्रती मिनीट क्षमतेचे) 17 असे एकूण 24 ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर देण्यात आले आहेत.

या सहकार्याबद्दल कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संस्थेचे  चे प्रमुख आमदार रोहित पवार आणि  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, नवीमुंबई जिल्हाध्यक्ष  अशोक गावडे, नवी मुंबई युवक अध्यक्ष राजेश भोर, युवक कार्याध्यक्ष सौरभ काळे, बेलापूर विधानसभा कार्याध्यक्ष आकाश पाटील, बारामती ॲग्रो लि. चे प्रतिनिधी अजय दोंदे  यांचे आभार मानले. तसेच करोना संकटामध्ये अशा पद्धतीने माणुसकीच्या भावनेतून पुढे येणाऱ्या अशा सर्व सामाजिक संस्थांचे कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मन:पूर्वक आभार मानले असून इतरांनीही जमेल त्या मार्गाने जिल्हा प्रशासनाला मदत करण्यासाठी पुढे यावे,असे आवाहनही केले आहे.

======================================================

  • इतर बातम्यांवरही दृष्टिक्षेप