गोव्यात पर्रिकर आज बहुमत सिद्ध करणार

पणजी, 16 मार्च 2017/AV News Bureau:

मित्र पक्षांच्या मदतीने गोव्यात सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमत्री मनोहर पर्रिकर यांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत एकूण 22 आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा राज्यातील भाजप सरकारने केला आहे.

गोव्यात सत्ता स्थापनेवरून सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसची मागणी फेटाळून लावल्यामुळे पर्रिकर यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला होता. तसेच पर्रिकर सरकारला 16 मार्चला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.

गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला 17 जागा मिळूनही इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करता आलेले नाही. त्यामुळे भाजपने पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली मित्र पक्षांच्या सहाय्याने सरकार स्थापन केले आहे. गोव्यात भाजपला दुसऱ्या क्रमांकाच्या 13 जागा मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड ब्लॉक पक्षाला 3,राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि अपक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत. यापैकी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड ब्लॉक आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपची सदस्य संख्या 22इतकी झालीआहे. या संख्याबळाच्या जोरावर पर्रिकर यांनी गोव्यात भाजपप्रणित सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापनेनंतर राज्यपालांनी पर्रिकर यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यानुसार आज पर्रिकर सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे.

विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यास सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या मित्र पक्षांना मंतीपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीवर यांच्याकडे गोव्याचं उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात येणार आहे.


मागोवा

अविरत वाटचाल विशेष :ग्राहक हित आणि संरक्षण