पनवेलसह  9 एसटी स्थानके चकाचक होणार

व्यापारी संकूल उभारण्यासाठी ई निविदा मागविल्या

मुंबई, 19 मार्च 2017/AV News Bureau:

राज्यातील एसटी  डेपो आधुनिक करण्याबरोबर त्याच ठिकाणी व्यापारी संकुलेही उभारण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. यामध्ये पनवेलसह नऊ ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील पनवेल एसटी डेपोसह  बोरीवली-नॅन्सी कॉलनी, पुणे-शिवाजी नगर, सोलापूर-पुणे नाका, नाशिक महामार्ग, औरंगाबाद-मध्यवर्ती, नांदेड –मध्यवर्ती, अकोला आणि नागपूर-मोरभवन या 9 ठिकाणच्या प्रकल्पांसाठी परिवहन मंडळाने 7 जानेवारी 2017 रोजी ई निविदा मागविल्या आहेत.