कांद्याचे दर स्थिर

घाऊक बाजारात 5 ते 7 रुपये किलो दराने विक्री

नवी मुंबई,11 एप्रिल 2017/AV News Bureau:

वाढीव उत्पादन आणि ग्राहकांचा कमी प्रतिसाद यामुळे वाशीच्या घाऊक बाजारपेठेत कांदा दर 5 ते 7 रुपये प्रतिकिलोने विकला गेला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर 5 ते 7 रुपये इतका स्थिर असल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.

देशातील कांदा उत्पादक राज्यांमध्ये उत्पादन चांगले आले आहे. मात्र उत्पादनाच्या तुलनेत मागणी मर्यादीत असल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर कमीत कमी 5 तर जास्तीत जास्त 7 रुपये इतका दर मिळत असल्याचे कांदा व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि इतर कांदा उत्पादक राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कांद्याच्या गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मंगळवारी 88 गाड्या कांदा दाखल झाला आहे. तर सोमवारी हेच प्रमाण 180 च्या आसपास होते. कालच्या  25 ते 30 गाड्या शिल्लक होत्या. मात्र आज नेहमीप्रमाणेच कांद्याची उचल झाली असली तरी दर 5 ते 7 रुपये इतके असल्याचे शेळके यांनी सांगितले.

दरम्यान, बाजारात हलक्या दर्जाच्या कांद्याला 3 रुपये इतका दर मिळत असून इतर कांदा प्रति किलो 5 ते 7 रुपये दरानेच विकला जात असल्याचे चंद्रकांत रामाणे या कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.