वॉकेथॉनसाठी 9 जानेवारीला वाहतुकीत बदल

नवी मुंबई पोलिसांचे रस्ते सुरक्षा अभियान

नवी मुंबई, 8 जानेवारी 17/AV  News Bureau :

रस्ता सुरक्षा अभियान 2017 अंतर्गत  नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्यावतीने 9 जानेवारी रोजी वॉकेथॉनचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक हजेरी लावणार असून वाहतुकीचा खोळंबा होवू नये म्हणून गरजेनुसार सकाळी 7.30 ते 9 या काळात वाहतूक मार्गात बदल तसेच प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सेंटर वन पार्किंग- वाशी प्लाझा- अभ्युदय बॅंक- शिवाजी चौक- फायर ब्रिगेड चौक येथून डावीकडे वळून पेडणेकर ज्वेलर्स  मार्ग आणि आणि पुढे राजीव गांधी जॉगर्स पार्क मिनी सी शोअर असे वॉकेथॉन आयोजित करण्यात आले आहे.

या वॉकेथॉनला मोठ्या संख्यने नागरिक आणइ शालेय विद्यार्थी हजर राहणार आहेत. वाशी प्लाझा ते फायर ब्रिगेड या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक असते. त्यामुळ वॉकेथॉनच्या दरम्यान या वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वॉकेथॉनच्या वेळेत आवश्यकतेनुसार प्रवेश बंदी तसेच मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

  1. वाशी प्लाझा कडून कोपरखैरणेकडे (फायर ब्रिगेड चौकपर्यंत) जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
  2. कोपरखैरणेकडून वाशी प्लाझाकडे येणारी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.

पुढील पर्याय –

वाशी प्लाझा कडून कोपरखैरणे (फायर ब्रिगेड चौककडे) जाणारी वाहने वाशी प्लाझा येथील बस थांब्याच्या पुढील बाजूस डावीकडे वळून पामबीचमार्गे कोपरखैरणे दिशेने जातील.

वाहतूक मार्गातील हा बदल 9 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह 2017 निमित्त आयोजित केलेल्या वॉकेथॉनकरीत करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी दिली.