‘Ambulance.run’ ॲप सुरू

अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, 24 मे 2017 /AV News Bureau:

‘Ambulance.run’ हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित ॲप आजपासून लोकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गोल्डन हवर सिस्टीम्स प्रा.लि. ‘या कंपनीने बनविलेले ‘Ambulance.run’ हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित ॲप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपचे उद्घाटन केले.

या ॲपद्वारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने ॲम्ब्युलन्स बुक करु शकतात. काही क्लिकद्वारे आपल्या जवळील ॲम्ब्युलन्स शोधण्यासाठी, बुक करण्यासाठी आणि सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.

  • 250 हून अधिक ऑपरेटरशी जोडलेले

‘Ambulance.run’ सध्या 250 हून अधिक ॲम्ब्युलन्स ऑपरेटर आणि 360 हून अधिक ॲम्ब्युलन्ससोबत जोडण्यात आले आहे. हे ॲप Google playstore वर उपलब्ध आहे. तसेच www.ambulance.run  या संकेतस्थळावर ॲम्ब्युलन्स बुक करणे शक्य होणार आहे.

  • कुटुंबांना माहिती मिळणे सोयीचे

वापरकर्ता ज्या ठिकाणाहून ॲपचा वापर करील, ते ठिकाण आपत्कालीन किंवा  त्या ठिकाणी मदत हवी असल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. तुमचा मित्रपरिवार आणि कुटुंबाअंतर्गत असलेल्या आपत्कालीन संपर्कासोबत तुमची आपत्कालीन माहिती शेअर केल्यानंतर त्यांना तुमच्या ॲम्ब्युलन्सची माहिती मिळवणे सोपे जाणार आहे.