पनवेलकरांना आठवड्यातून पाच दिवस पाणी

पनवेल,19 एप्रिल 2017/AV News Bureau:

आठवडयातून किमान पाच दिवस पिण्याचे पाणी पनवेलकारांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाकर यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

पनवेल शहराला गेल्या दोन महिन्यापासून एक दिवसआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आज महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या सोबत भाजपाचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतॄत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेउन चर्चा केली. या चर्चेमध्ये आठवडयातील पाच दिवस पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.