मेन आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई, 22 एप्रिल 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात दोन्ही मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

  • सकाळी 11.12 ते दुपारी 4.27 या काळात माटुंगा येथून सर्व डाउन गाड्या माटुंगा आणि मुलुंड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान फास्ट मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच या गाड्यांना सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यानंतर या गाड्यांना मुलुंड स्थानकापासून पुन्हा स्लो मार्गावर वळविण्यात येतील.
  • स्लो मार्गावर विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहुर रेल्वे स्थानकांत गाड्या थांबविण्यात येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना घाटकोपर,भांडुप आणि मुलुंड स्थानकांवरून प्रवास करता येणार आहे.
  • 22 ते 3.28 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट गाड्या नियमित स्थानकांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांमध्ये थांबविण्यात येणार आहेत. या गाड्या 15 मिनिटे उशिरा धावणार आहेत.
  • 48 ते दुपारी 2.54 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट गाड्या नियमित स्थानकांव्यतिरिक्त  घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबणार आहेत. या गाड्या 20 मिनिटे उशिरा धावणार आहेत.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व स्लो गाड्या 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • सीएसटी-चुनाभट्टी/माहिम डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 आणि चुनाभट्टी/माहिम- सीएसटी अप मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
  • सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 या काळात सीएसटीहून वाशी,बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या आणि 10.38 ते दुपारी 4.43 या काळात सीएसटीहून वांद्रे, अंधेरीकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 या काळात पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसटीकडे जाणाऱ्या अप गाड्या आणि सकाळी 1044 ते दुपारी 4.13 या काळात वांद्रे, अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावर प्लॉटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बरमार्गावरील प्रवाशांना मेन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात प्रवास करण्याची परवानी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

संबधित बातम्या

  • ट्रान्सहार्बरवर तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक

https://www.aviratvaatchal.com/2017/04/18/transharbour-traffic-block-2/