एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, 28  नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एमपीएससाचे हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

  • राज्य कर (विक्रीकर) निरीक्षक मुख्य परिक्षा

राज्य कर (विक्रीकर) निरीक्षक परीक्षा 2017 (परीक्षेसाठी मागणीपत्र प्राप्त 19 एप्रिल) साठीची पूर्व परीक्षा 16 जुलै 2017 रोजी घेण्यात आली होती. आता या पदासाठीची मुख्य परीक्षा 7 जानेवारी 2018 रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

राज्य सेवा परीक्षा 2018 साठीची जाहिरात डिसेंबर 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा  8 एप्रिल 2018 रोजी तर मुख्य परीक्षा 18 ते 20 ऑगस्ट 2018 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे.

 

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी जानेवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पूर्व परीक्षा 6 मे 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2018 अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- 26 ऑगस्ट 2018 रोजी, पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक)-  2 सप्टेंबर 2018, पेपर क्रमांक 2 (राज्य कर निरीक्षक)-  30 सप्टेंबर 2018, पेपर क्र. 2 ( सहायक कक्ष अधिकारी)-6 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

 

  • महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2018 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.पूर्व परीक्षा 13 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा 8 सप्टेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

 

  • सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा

सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2018 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा 20 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर2018 रोजी घेण्यात येणार आहे.

 

  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 2018 साठी मार्च 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पूर्व परीक्षा 10 जून 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2018अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1-  14 ऑक्टोबर 2018 रोजी,

संयुक्त पेपर क्रमांक 2 (लिपिक-नि-टंकलेखक)-  21 ऑक्टोबर 2018,

संयुक्त पेपर क्रमांक 2 (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क)- 4 नोव्हेंबर 2018,

संयुक्त पेपर क्रमांक 2 (कर सहायक)- 2 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

 

  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा  मार्च 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

पूर्व परीक्षा 24 जून  तर मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.

 

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा  एप्रिल 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा  8 जुलै 2018 मध्ये घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 17 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा  24 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 25 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

हाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 15 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- 2018 साठी मे 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून शनिवार दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2018 साठी मे, 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018 रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.