अग्नि -2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

मुंबई, 4 मे 2017/AV News Bureau:

भारताने आज संरक्षण क्षेत्रात मोठा पल्ला गाठला आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणा-या अग्नि 2 या अत्याधुनिक अण्वस्र क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओदिशाच्या किना-यावरील व्हीलर आयलंडवरून सकाळी 10.20 ला ही चाचणी घेण्यात आली. दोन हजार किलोमीटरवरील लक्ष्यावर मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

हे अत्याधुनिक क्षेपणास्र भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट आहे. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

अग्नि -2 क्षेपणास्राची वैशिष्ट्ये

  • मारक क्षमता -2 हजार कि.मी.
  • लांबी -20 मीटर
  • वजन -17 टन
  • क्षेपणास्राची पे लोड क्षमता -1 हजार कि. ग्रॅ.