मराठी संवर्धनासाठी बोली भाषांचे सर्वेक्षण

marathi

भाषिक नकाशा तयार करण्याचे काम सुरू

नवी मंबई, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मराठी भाषा संवर्धनाच्या दिशेने राज्य सरकार अनेक उपक्रम राबवित आहे. त्यादृष्टीने राज्याच्या वेगवेगळ्या भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषांचे सखोल सर्वेक्षण करून भाषिक नकाशा तयार करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. तसेच सध्याचे वाढते संगणकीकरणाचे युग मराठी भाषेच्या विकासासाठी अतिशय पोषक असल्याचे मत राज्य मराठी विकास संस्थेचे अधिकारी सुशांत देवळेकर यांनी व्यक्त केले.

वि.वा शिरवाडकर अर्थात कसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नवी मुंबई साहित्य परिषद यांनी नवी मुंबईत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ‘अविरत वाटचाल न्यूज’ शी बोलताना देवळेकर यांनी मराठी संवर्धनासाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.