पेट्रोल 2.16 तर डिझेल 2.10 रुपयांनी स्वस्त

मुंबई, 16 मे 2017/AV News Bureau:

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर 2 रुपये 16 पैसे तर डिझेल 2 रुपये 10 पैशांनी स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढत होते. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र आता पेट्रोल,डिझेलचे दर कमी असून मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत.