उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 13 मार्च 2018:

मुलांच्या परिक्षा संपल्या की, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावाचे वेध लागतात. उन्हाळी सुट्टीत कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड या दरम्यान दोन्ही मार्गांवर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक 01051/01052 लोकमान्य टिळक –करमाळी-लोकमान्य टिळक  विशेष गाड्या
  • गाडी क्रमांक 01051 लोकमान्य टिळक –करमाळी विशेष गाडी 17 मे ते 7 जून या काळात दर शुक्रवारी रात्री 8.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल  आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01052 करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष गाडी 19 मे ते 9 जून या काळात दर रविवारी दुपीर 12.50 ला करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.20 ला एलटीटीला पोहोचेल.
गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड,  कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना

या विशेष गाडयांना २४ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये २ टायर एसीचे १, ३ टायर एसीचे ४ डबे, स्लीपरचे १३ डबे आणि जनरलचे ४ डबे, एसएलआर २ डबे जोडण्यात येतील.

 

गाडी क्रमांक ०१०१६/०१०१५ करमाळी-लोकमान्य टिळक –करमाळी विशेष
  • गाडी क्रमांक ०१०१६ करमाळीःएलटीटी ही विशेष साप्ताहिक गाडी १८ मे ते ८ जून या काळात दर शनिवारी दुपारी १२.५० ला करमाळीहून सुटेल आमि त्याच दिवशी रात्री ११.५५ ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०१०१५ एलटीटी- करमाळीःएलटीटी ही विशेष साप्ताहिक गाडी १९ मे ते ९ जून या काळात दर रविवारी मध्यरात्री१.१० ला एलटीटीहून टेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० ला करमाळी स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वस रोड, चिपळुण, खेड, रोहा, पनवेल आणि ठाणे स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

२४ डब्यांमधील २ टू टायर एसीचा १ डबा, ३ टायर एसीचे ४, स्लीपर १३, जनरल ४ डबे जोडण्यात येणार आहेत .

गाडी क्रमांक ०१०४५/०१०४६ एलटीटी ते करमाळी- एलटीटी विशेष
  • गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी एलटीटी ते करमाळीदरम्यान १२ एप्रिल ते ७ जून या काळात दर शुक्रवारी मध्यरात्री १.१० ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० ला करमाळी स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०१०४6 ही विशेष गाडी करमाळी ते एलटीटीदरम्यान १२ एप्रिल ते ७ जून या काळात दर शुक्रवारी दुपारी १२.५० ला करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.३० ला एलटीटीला पोहोचेल.
गाडीचे थांबे

या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, रोजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंदुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

गाडी क्रमांक 01037/01038 एलटीटी- सावंतवाडी रोड-एलटीटी
  • गाडी क्रमांक 01037 ही विशेष गाडी 8 एप्रिल ते 3 जून या काळात दर सोमवारी मध्यरात्री 1.10 ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01038 ही विशेष गाडी 8 एप्रिल ते 3 जून या काळात दर सोमवारी दुपारी 2.10 ला सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.20 एलटीटीला पोहोचेले.
गाडीचे थांबे

या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

१७ डब्यांच्या या गाडीला २ टायरी एसीचा१, ३ टायर एसीचे २, ८ स्लीपर आणि ४ जनरल डबे जोडण्यात येणार आहेत.

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा