सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 29 फेब्रुवारी 2024 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे गुणाजी गावडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते.

========================================================


========================================================

========================================================