पनवेल निवडणूक:स.9.30 पर्यंत10 टक्के मतदान

नवी मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सुरू असलेल्या मतदानाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. सकाळी 7.30 ते 9.30 या काळात 10 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये 18 टक्के इतके झाले आहे. तर सर्वाधिक कमी प्रभाग क्रमांक 5 मध्ये 4 टक्के इतके झाले आहे.

सकाळच्या पहिल्या सत्रात 44 हजार 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये 16 हजार 899 महिला तर 27 हजार 535पुरूषांनी मतदान केल्याची माहिती पनवेल महापालिका प्रशासनाने दिली आहे

सकाळी 7.30 ते 9.30 या काळात झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे-

 

table