ठाण्यात 3693 धोकादायक इमारती, 69 तोडणार

ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे,24 मे 2017/AV News Bureau:

ठाणे शहरात एकूण 3693 अतिधोकादयक आणि धोकादायक इमारती आहेत. यातील 69 अतिधोकादायक इमारती तोडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यामुळे आजपासून ही कार्यवाही करण्यात येणार आहे. याशिवाय 91 धोकादायक गटात मोडणाऱ्या इमारती खाली करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

धोकादायक इमारतींबाबत सद्यस्थितीची आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि सर्व खातेप्रमुख यांची बैठक येथील नागरी संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली होती.

ठाणे शहरामध्ये एकूण ३६९३ अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची संख्या आहे. यातील सी १ म्हणजेच अतिधोकादायक या संवर्गात एकूण ६९ इमारती येत असून या इमारतींपैकी खाली केलेल्या सर्व इमारती आजपासून निष्काषित करण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच उर्वरित इमारती खाली करून त्या निष्काषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सी २ अे म्हणजेच धोकादायक या गटातील इमारतींची संख्या ९१ असून सदर इमारती खाली करण्याची कारवाई त्वरीत सुरू करण्याची कारवाई करतानाच सी २ बी तसेच सी ३ या गटात येणा-या इमारतींची नियमित पाहणी करून त्याबाबतचा अहवाल मुख्यालयास सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी दिले.