पनवेलमध्ये 11.30 पर्यंत 23 टक्के मतदान

नवी मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सकाळी 11.30 पर्यंत 23 टक्के मतदान झाले आहे.  9.30 ते 11.30 या काळात सुमारे 13 टक्के मतदान झाल्याची माहिती पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळी 7.30 ते 9.30 या काळात 10 टक्के मतदान झाले  होते.  सकाळच्या सत्रात मतदारांनी चांगली हजेरी लावली होती. सकाळच्या दुसऱ्या टप्प्त्याही लोकांचा उत्साह जाणवत होता. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी 23 पर्यंत पोहोचली आहे.

list11.30

दरम्यान, सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी दिली.