बारावीचा रिझल्ट 89.50 टक्के

  • यंदाही मुलींचेच वर्चस्व
  • कोकण विभाग आघाडीवर तर मुंबई तळाला

पुणे, 30 मे 2017:

राज्यातील बारावीचा रिझल्ट जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालांमध्येही मुलींनीच बाजी मारली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षेच्या निकालाची विभागवार माहिती देण्यात आली.

यावर्षी  सुमारे 14 लाख 29 हजार 478 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 79 हजार 406 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांची संख्या 86.65 टक्के तर मुलींची संख्या 93.05 टक्के इतकी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने  पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागातून सर्वाधिक 95.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर सर्वाधिक कमी मुंबईचा (88.21 टक्के) निकाल लागला आहे.

  • गुणपत्रिका 9 जूनला मिळणार

बारावीचा रिझल्ट आज लागला असला तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका 9 जूनला आपापल्या शाळेत मिळणार आहे. सकाळी 11 वाजता गुणपत्रिका शाळेपर्यंत पोहचवण्यात येतील. त्यानंतर तीन वाजल्यापासून शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप होईल. 31 मे ते 9 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्ससाठी विद्यार्थ्यांना ४०० रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.

राज्याचा विभागनिहाय निकाल

  • कोकण – 20%
  • कोल्हापूर – 91.40%
  • पुणे – 91.16%
  • औरंगाबाद – 89.83%
  • अमरावती – 89.12%
  • नागपूर-89.05%
  • लातूर – 88.22%
  • नाशिक – 88.22%
  • मुंबई – 88.21%
  • शाखानिहाय निकाल
  • विज्ञान – 95.85%
  • कला – 81.91%
  • वाणिज्य – 90.57%

 या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल

www.mahresult.nic.in