मालमत्ता कर 15 जूनपर्यंत भरल्यास सवलत

ठाणे,1 जून 2017/AV News Bureau:

मालमत्ता कराची थकबाकी आणि पुढील सहा महिन्याच्या बिलाची रक्कम थकबाकीसह आगाऊ भरता यावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या सवलत योजनेला 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 जूनपर्त कर भरणा करणाऱ्यांना 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

सन 2017-2018 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले प्रभागनिहाय तयार करुन नागरिकांना वितरीत करण्यात आलेली आहेत.  या योजनेंतर्गत जे मालमत्ताधारक थकबाकीसह मालमत्ता कराच्या पहिल्या सहामाही बिलाच्या रकमेसह पुढील सहामाहीच्या बिलाची रक्कम आगाऊ 15 जून पर्यंत भरतील अशा मालमत्ताधारकांना त्यांच्या बिलातील दुस-या सहामाहीच्या रक्कमेवर ही 10% सवलत देण्यात येणार आहे. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.