भारतात आता 12 ब्लू फ्लॅग बीच

ब्लू फ्लॅग म्हणजे समुद्रकिना-यांचे नीलध्वज मानांकन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ६ नोव्हेंबर २०२२

जगभरातल्या पर्यटकांना स्वच्छ सुंदर आणि सर्व प्रकारच्या सुख सोयी उपलब्ध असणा-या समुद्रकिना-यांना नीलध्वज मानांकन अर्थात ब्लू फ्लॅग बीच म्हणून ओळखले जाते.

जगभरातल्या स्वच्छ आणि निसर्गसौंदर्य लाभलेल्या समुद्र किना-यांना डेन्मार्क मधील पर्यावरण शिक्षण(FEE) या संस्थेकडून आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट पुरस्कार जाहीर केले जाते. जगभरातल्या पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिना-याची माहिती व्हावी यासाठी किना-यांवर ब्लू फ्लॅग फडकवला जातो. देशातल्या 8 समुद्रकिना-यांना हे सर्टिफिकेट मिळाल्याची घोषणा ऑक्टोबर 2020 मध्ये करण्यात आली होती.  28 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या 8 समुद्रकिनाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग आभासी पद्धतीने फडकावला. किनारपट्टी भागातील प्रदूषण नियंत्रणासाठी हे पारितोषिक देण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपमधील मिनिकॉय, थुंडी आणि कदमत समुद्रकिनारे या आणखी 2 समुद्रकिना-यांचा समावेश या यादीत करण्यात आला. आता भारतात एकूण 12  नीलध्वज अर्थात ब्लू फ्लॅग मानांकन असणारे किनारे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

लक्षद्विप समूहांमधील सर्वात जुना आणि सुंदर असा हा थुंडी बीच समुद्रकिनारा आहे. पांढरी वाळू, खाडी आणि निळा समुद्र पर्यटक आणि पोहणा-यांसाठी स्वर्ग मानला जातो. वॉटर स्पोर्टसाठी कदमत हा किनारा फार प्रसिध्द आहे.

ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र हे 33 कडक निकषांवर आधारित “डेन्मार्क मधील पर्यावरण शिक्षण” फाउंडेशनद्वारे मान्यता प्राप्त एक जागतिक स्तरावरील पर्यावरणीय प्रमाणपत्र आहे. भारताचा समावेश आता 50 ब्लू फ्लॅग ठिकाणं असणा-या यादीत करण्यात आला आहे. नीटनेटके स्वच्छ सागरी किनारे हे किनारपट्टीचे वातावरण चांगले असण्याचे दर्शक मानले जाते.

  •  आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग फडकावलेले समुद्र किनारे
कप्पड (केरळ), शिवराजपूर (गुजरात), घोघला (दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), ऋषिकोंडा (आंध्र प्रदेश), गोल्डन (ओदिशा) आणि राधानगर (अंदमान निकोबार बेटे ), मिनिकॉय थुंडी आणि कदमत (लक्षद्वीप बेट)

जून 2018 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी भारताने एकाच वेळी 13 किनारपट्टीवरील राज्यांमधून आय-एम-सेव्हिंग-माय-बीच ही किनारपट्टी स्वच्छता चळवळ सुरु केली. किनारा पर्यावरण आणि सौंदर्यशास्त्र व्यवस्थापन सेवा कार्यक्रम राबवून किनारपट्टीच्या क्षेत्राच्या शाश्वत विकासाचा प्रवास सुरू केला.

================================

  • Print Edition