गणेशोत्सवानंतर अनधिकृत प्रार्थनांस्थळांवर कारवाई

  • महापालिकास्तरिय समितीच्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

 अविरत वाटचाल न्यूज

ठाणे, 5 सप्टेंबर 2018:

शहरातील उर्वरित अनधिकृत प्रार्थनास्थळे गणेशोत्सवानंतर निष्काषित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा अनधिकृत स्थळांचे बांधकाम नियमित करणे अंतर्गत महापालिका स्तरिय समितीचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घेतला.

  • या बैठकीत सार्वजनिक ठिकाणी असलेली 265 प्रार्थनास्थळे नियमित करण्याबाबत संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत संबंधित विभागास कळविण्याबाबतचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले.

 

  • संबंधित विभागाला सदरची प्रार्थनास्थळे निष्काषित करायची असतील तर त्यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त आणि महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य करण्याबाबतही सुतोवाच केले.

 

  • उर्वरित 63 अनधिकृत प्रार्थनास्थळे गणेशोत्सवानंतर निष्कासित करण्याचे आदेशही सर्व सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

 

  • अ वर्गवारीमधील सर्व प्रार्थनास्थळांचे गुगल सर्वेक्षण करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत.

 

नागरी संशोधन केंद्र येथे पार पडलेल्या बैठकीस अप्पर पोलिस आयुक्त सत्यनारायण, अतिरिक्त आयुक्त(1) राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे, पोलिस उपायुक्त डी. एस. स्वामी, पोलिस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासह वन विभाग, म्हाडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

==============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उलवे टेकडीचे सपाटीकरण