शेतकरी संपावर

दूध आणि भाजीपाला फेकून निषेध

मुंबई, 1 जून 2017/AV News Bureau:

शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा आणि कर्जमाफी द्यावी यांसारख्या अनेक मागण्यांसाठी राज्यातले शेतकरी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपकरी शेतक-यांनी शहरांकडे येणारा कृषीमाल आणि दूधपुरवठा रोखण्यास सुरूवात केली आहे. नगर,नाशिक जिल्हांतील दूध संकलन बंद झाले आहे तर बारामती, धुळे, लासलगाव इथले आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. तर सोलापूर जिल्हातील करमाळा, मंगेवाडी, ति-हे,नांदेड, शिर्डी येथे दूध आणि कांदा रस्त्यावर फेकून शेतक-यांनी आपला निषेध नोंदवला आहे. या बंदला गालबोट लागलं असून औरंगाबाद मध्ये गजानन देशमुख या तरूणाला व्यापा-यांकडून मारहाण करण्यात आली आहे.

किसान क्रांती समन्वयक समितीने या संपाची घोषणा केली होती. त्यानुसार कोकण आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता 40 हून अधिक संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफाशी लागू कराव्यात. शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, शेतक-यांना 60 वर्षानंतरन निवृत्तीवेतन द्यावे या काही प्रमुख मागण्या आहेत.

नवी मुंबईत संपाचा परिणाम नाही

वाशी च्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या संपाचा परिणाम जाणवत नसला तरी संप सुरू राहिल्यास उद्या शेत मालाची आवक होणार नसल्याची माहिती व्यापारी प्रतिनिधींनी दिली. कांदा- बटाटा मार्केटमध्ये आज 106 गाड्या कांदे आणि 60 गाड्या बटाटे यांची आवक झाली आहे अजूनही 70 गाड्या कांदे-बटाटे शिल्लक आहेत त्यामुळे दोन दिवस तरी या बाजारातील किमतींवर परिणाम जाणवणार नाही अशी माहिती कांदा-बटाटा आडत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिली. भाजीपाला बाजारात आज 415 गाड्यांची आवक झाली आहे. आज भाजीपाल्यांच्या किमतीमध्येही फरक झाला नसल्याची माहिती व्यापारी पदाधिका-यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्हातल्या तुळजापूर तालुक्यातल्या शेतक-यांनी भाजीपाला आणि दूध बाजारात आणले नाही, तर भून तालुक्यातल्या शेतक-यांनी संकलन केलेलं दूध रस्त्यावर ओतल आहे. अहमदनगर इथे मुंबईकडे जाणार शेतमाल टाकळी ढोकेश्वर इथं अडवण्यात आला आहे