रिपब्लिकन सेनेतर्फे वृक्षारोपण

नवी मुंबई, 6 जून 2017/AV News Bureau:

रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने तुर्भे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ख्वाजामिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे वृक्षारोपण करण्यात आले.

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षातर्फे नवी मुंबईतल्या तुर्भे भागात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वृक्षतोडीमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तुर्भे परिसरात अनेक उद्योग आहेत. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भिती आहे. यापार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबाबत जनजागृती व्हावी आणि  वृक्षसंवर्धन व्हावे यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आल्याचे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ख्वाजामिया पटेल यांनी सांगितले.