प्रधानमंत्री शिष्यवृत्ती:15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

मुंबई, 13 सप्टेंबर 2017/AV News Bureaupradhanmantri scholarship 

प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी www.ksb.gov.in  या संकेतस्थळावर 15 नोव्हेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी केले आहे. pradhanmantri scholarship 

  • इयत्ता 12 वी/पदवी/पदविका परीक्षेमध्ये कमीत कमी 60 % पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन मान्यताप्राप्त व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी सन 2017-18 मध्ये प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांची, विधवांचे पाल्य तसेच विधवा यांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना लागू आहे.
  • केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून देशातून प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना त्यांनी प्राप्त केलेल्या गुणानुक्रमे, वर्गवारीनुसार एकूण 5 हजार 500 पाल्यांना वाटप करण्यात येते.
  • मुले आणि मुलीं यांना प्रत्येकी समान 2750 शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात येते.
  • या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुलांना 24 हजार रुपये व मुलींना 27 हजार रुपये प्रतीवर्ष शिष्यवृत्ती दिली केली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी अधिकृत अभ्यासक्रमाची यादी तसेच इतर अनुषंगिक माहिती केंद्रिय www.ksb.gov.in वर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही रत्नपारखी यांनी केले आहे.