विदेशी पर्यटकांसाठी बहुभाषिक हेल्पलाईन

मुंबई,19 जून 2017/AV News Bureau:

भारतात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 24 तास सेवा देणारी बहुभाषिक हेल्पलाईन सुरू केली आहे. पर्यटनस्थळांची माहिती अथवा पर्यटनासंदर्भातील सुविधांच्या माहितीसाठी 1800111363 वा 1363 येथे संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.

  • दहा आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये हेल्पलाईन

या हेल्पलाईनद्वारे इंग्रजी, हिंदी बरोबरच अरेबिक, फ्रेंच, जर्मनी, इटालियन, जापनिज, कोरियन, चायनिज, पोर्तुगिज, रशियन आणि स्पॅनीश या दहा आंतरराष्ट्रीय भाषांमधून माहिती दिली जाणार आहे. विदेशी पर्यटकांना भारतात पर्यटनाच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, भारतात मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. यंदाचे वर्ष हे व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून घोषित केले असल्याने त्या धर्तीवर ही बहुभाषिक हेल्पालाईन महत्त्वाची ठरणार आहे.