हार्बर मार्गावर उद्या (25 जूनला) मेगाब्लॉक

मुंबई, 24 जून 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर उद्या  मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान मेगाब्लॉक

  • सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 या काळात सीएसटीहून पनवेल, बेलापूर, वाशीला जाणाऱ्या तसेच सकाळी 10.20 से दुपारी 3.48 या काळात पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4 या काळात ट्रान्सहार्बर/ मेन लाइनवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Updated News-

हार्बर मार्गावरील आजचा (25 जून) मेगाब्लॉक रद्द
https://goo.gl/h1kZgZ