कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर जुईनगर परिसरात नागरिकांची तपासणी करा

भाजप युवा नेते आणि ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांची महापालिकेकडे मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ५ मे २०२०

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी तसेच वेळीच उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने शहरातील काही भागांमध्ये नागरिकांचे मास स्क्रिनिंग करण्यास सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील सर्वच भागांमध्ये अशाप्रकारे तपासणी करण्याची मागणी होत असून जुईनगर परिसरातही मास स्क्रिनिंग त्वरीत करावे, अशी मागणी नवी मुंबई भाजपचे युवा नेते आणि ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना विषयीची चाचणी करण्याची मागणी केली जात आहे. सध्या महापालिकेने कोपरखैरणे, तुर्भे आणि आजूबाजूच्या भागात महापालिकेच्यावतीने नागरिकांच्या कोरोनाविषयक चाचण्या करण्यात आल्या. नागरिकांनीही महापालिकेच्या या प्रयत्नांचे कौतूक केले आहे. मात्र आता सर्वच भागांमध्ये अशाप्रकारच्या चाचण्या कराव्यात अशी मागणी होवू लागली आहे.

जुईनगर परिसरातही महापालिकेच्यावतीने नागरिकांच्या चाचण्या केल्या जाव्यात अशी मागणी नवी मुंबई भाजपचे युवा नेते आणि ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

==============================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा