क्षयरुग्ण शोधण्यासाठी महापालिकेची मोहीम

नवी मुंबई,15 जुलै 2017/AV News Bureau:

नवी मुंबई शहरात  महापालिकेच्यावतीने 17 ते 31 जुलै या काळात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात एकूण 8 जिल्हे व 7 महानगरपालिकांतर्गत क्षेत्रातही ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी.बी.डी., नेरुळ-1, तुर्भे, इंदिरानगर, पावणे, नोसील नाका, कातकरीपाडा, चिंचपाडा, इलठणपाडा व दिघा या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या दूर्गम व झोपडपट्टी कार्यक्षेत्राची सर्वेक्षणाकरीता निवड करण्यात आली आहे.

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 101 समूह तयार करण्यात आले आहेत.  या मोहीमेत 52367 घरांमधील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या विभागातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना क्षयरुग्ण शोध मोहीम सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.