मध्य, हार्बरवर उद्या (१६ जुलै) मेगाब्लॉक

मुंबई,15 जुलै 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेने मेन आणि हार्बर मार्गावर उद्या (16 जुलै) मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे  मेन आणि हार्बरवरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

विक्रोळी-दिवा डाउन स्लो मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक

  • सकाळी 10.56 ते दुपारी 4.33 या काळात घाटकोपरहून सुटणाऱ्या सर्व डाउन स्लो गाड्या विक्रोळी आणि दिवा स्टेशनच्या दरम्यान डाउन फास्ट मार्गावर चालविण्यात येतील. या गाड्या विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकावर थांबतील तसेच दिवा स्टेशनपासून पुन्हा डाउन स्लो मार्गावरून चालविण्यात येतील.
  • डाउन स्लो मार्गावरील गाड्या कांजुरमार्ग, नाहुर, कळवा, आणि मुंब्रा स्थानकांवर थांबणार नाहीत. मेगाब्लॉकच्या काळात या स्थानकांवरील प्रवाशांना विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे आणि दिवा स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • सकाळी 11.22 ते दुपारी 4.02 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट मार्गावरील गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकावर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 10.48 ते दुपारी 2.54 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थाबंतील. या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि परत येणाऱ्या सर्व स्लो मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या काळात मेगाब्लॉक

  • सकाळी 10.35 ते दपारी 3.37 या काळात सीएसएमटीवरून पनवेल, बेलापूर,वाशीला जाणाऱ्या सर्व डाउन गाड्या तसेच 10.20 ते दुपारी 3.48 या काळात पनवेल, सीबीडी,वाशीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या मेगाब्लॉकच्या काळात रद्द करण्यात आल्या आहेत.
  • मेगाब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बरमार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर आणि मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.